TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर महापालिकेचा भर; वैद्यकीयसाठी बजेटमध्ये तरतूद वाढविली

पिंपरी चिंचवड | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. महापालिकेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात वैद्यकीयसाठी तरतूद वाढविण्यात आली. वैद्यकीय सेवासांठी 137 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. गतवर्षी 101 कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा त्यात 37 कोटी रुपयांनी वाढ केली.

संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. पहिली, दुसरी लाट तीव्र होती. तर, तीस-या लाटेत रुग्णसंख्या वाढली. पण, मृत्यू, उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जास्त होते. कोरोना अद्यापही गेला नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद देखील वाढविण्यात आली आहे.

नवीन आर्थिक वर्षात नवीन भोसरी रूग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन थेरगाव रूग्णालय आणि आकुर्डी रुग्णालय या चार रुग्णालयात 24 तास रूग्ण सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना 24 तास वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकरीता तातडीणे प्रथमोपचार करणेकामी शहरात जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु केले जाणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ उभारणार आहे. महापालिका आणि यूएनडीपीने देशाच्या पहिल्या ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ची आखणी आणि अंमलबजावणी यावर चर्चा सुरु केली आहे. यूएनडीपी, संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था आहे. आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे यांचे महत्वाचे कार्यक्षेत्र आहे.

पिंपरी महापालिका केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. काही रुग्णालयांना असंसर्गजन्य रोगांकरिता विशिष्ट उपचार केंद्रांमध्ये (एनसीडी) रुपांतरित करण्याची योजना आखत आहे.

नागरिकांना उपलब्ध होणा-या आरोग्य सेवांच्या सुधारित स्तरासाठी महापालिका पायाभूत सुविधा सुधारणे, आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेची क्षमता वाढविणे यासाठी यंत्रणेची स्थापना, प्रक्रिया आणि प्रोटोकॉलचे मानांकीकरण यासाठी गुंतवणूक करणार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बाँड’ हा दृष्टीकोन विचारात घेण्यात येत आहे. हा एक परिणाम आधारित वित्तपुरवठा आणि अंमलबजावणीचा दृष्टीकोन आहे. जेथे गुंतवणूकदारांना योग्य तो निकाल मिळाल्यानंतर मोबदला दिला जातो.

याबाबत बोलताना अतिरिक्त विकास ढाकणे म्हणाले, ”वैद्यकीय, शिक्षण, क्रीडा या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर आमचा भर आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी महापालिका प्रयत्नशिल आहे. प्रथमोपचार करणेकामी शहरात जागोजागी जिजाऊ क्लिनिक सुरु केले जाणार आहे. वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यासाठीच बजेटमध्ये तरतूद वाढविण्यात आली आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button