Uncategorized

अयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच अयोध्येच्या रेल्वे स्थानकाचाही होणार कायापालट

अयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच अयोध्येचं रेल्वे स्थानकही भारतीय रेल्वेसाठी एक विशेष स्थानक आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर दररोज अनेक गाड्या चालवल्या जातात. आता अयोध्येत राम मंदिर बनणार आहे, तर अयोध्या स्थानकाचा देखील कायापालट होणार आहे. या रेल्व स्थानकाला राम मंदिराच्या धर्तीवरच पुन्हा डिझाइन केले जाणार आहे. जून 2021 पर्यंत स्थानकाचे काम पूर्ण होणार आहे.

रेल्वे विभागाच्या वतीने अयोध्या रेल्वे स्थानक, प्रवासी सुविधा, स्वच्छता, सौंदर्य आणि वेगवेगळ्या अत्यावश्यक सुविधांच्या रूपात मोठा बदल करून रेल्व स्थानकाला नवीन मार्गाने सजवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन आणि आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज अयोध्या स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात या स्थानकासाठी 80 कोटी रुपये मंजूर झाले होते, आता ती वाढवून 104 कोटी करण्यात आले आहे. स्थानकाची इमारत रेल्वेची कंपनी तयार करत आहे.

अयोध्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2/3 मध्ये विकास कामे, विद्यमान परिसंचरण क्षेत्र आणि धारण क्षेत्र विकसित केले जाईल. दुसर्‍या टप्प्यात नवीन स्टेशन इमारत व इतर सुविधांचे बांधकाम केले जाईल. या सुविधा स्थानकाच्या आत आणि बाहेरील भागात दिल्या जातील. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय तिकीट काउंटर, वेटिंग हॉल, वातानुकूलन 3 विश्रांती कक्ष, 17 बेडचे पुरुष वसतिगृह, 10 बेडची सुविधा असेलेले महिला वसतिगृह, अतिरिक्त फुट ओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, अतिरिक्त शौचालय या सुविधांची संख्या वाढविण्याचे काम सुरु होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button