Uncategorized

SBI ची व्याजदरात कपात, कर्जदारांना दिलासा

मुंबई | महाईन्यूज | भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच SBI व्याजदरात ०. १० टक्क्याची कपातकरून कर्जदारांना दिलासा दिला आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा MCLR आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.

7 ‘एसबीआय’ने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर हा ०.१० टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा MCLR आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे. चालू वर्षात बँकेने सलग आठव्यांदा MCLR मध्ये कपात केल्याचा दावा एसबीआयने केला आहे. नवे व्याजदर येत्या १० डिसेंबरपासून लागू होतील, असे बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मात्र रेपो दरांशी संलग्न कर्जे आणि ठेवीदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही ‘एसबीआय’ने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button