breaking-newsआंतरराष्टीय
सेक्स करताना बाल्कनीमधून खाली पडले; प्रेमी युगुलाचा मृत्यू
इक्वॅडोर देशामध्ये एका विचित्र दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये सेक्स करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका प्रेमी युगुलाचा मृत्यू झाला आहे. क्विटो शहरामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये एक २८ वर्षीय महिला आणि ३५ वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या २८ वर्षीय महिलेने तिच्या घरी जवळच्या मित्रांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी संपल्यानंतर ही महिला आणि तिचा ३५ वर्षीय प्रियकर घराच्या बाल्कनीमध्ये जाऊन सेक्स करु लागले. मात्र यादरम्यान दोघांचा तोल गेला आणि ते तिसऱ्या मजल्यावरुन नग्न अवस्थेमध्येच थेट खाली पडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.