breaking-newsपिंपरी / चिंचवड

अमृता फडणवीस यांचे हस्ते पिंपळेगुरवमध्ये ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्काराचे वितरण

पिंपरी –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे यांच्यावतीने शनिवारी (दि. 1) पिंपळेगुरव येथे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रियदर्शनी हिंगे, प्राजक्ता खानविलकर, रमा मालखरे, आदिती खोत, ओवी सातपुते आणि लक्ष्मी गालफाडे यांना ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी डेक्कन मॅकेनिकल अण्ड केमिकल इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रभा नातू आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सुधीर गाडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button