breaking-newsपुणे

#waragainstcorona: आरोग्य यंत्रणेस माजी सैनिकांकडून आरोग्य किटचे वाटप; बांधकाम,स्वच्छता कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

शासकीय पुनःनियुक्त माजी सैनिक संघटना, श्री सिध्दीविनायक सांस्कृतीक ट्रस्ट व नवभारत मानवतावादी संस्थेच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी सक्षमपणे लढा देणा-या आरोग्य व पोलिसयंत्रणेचा आरोग्यकिट आणि संघटनेचा कर्मयोगी विशेषांक देऊन  आभार मानण्यात आले. 

महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त बांधकाम/स्वच्छता कामगारांना मास्क, सॅनिटायझर व आटा, तांदूळ, रवा, साखर, डाळ, इत्यादी जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष व विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, कोषाध्यक्ष निरंजन काकडे, अंबादास पालवे, बलभीम पवार तसेच संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 डॉ राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता व कोविड-१९ लॅबरोटरी प्रमुख, बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच डॉ. रमेश भोसले, प्राध्यापक व विभागप्रमुख, ससून सर्वोपचार रुग्णालय आणि नायडू हॉस्पीटल मध्ये कोरोना पेशंटवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉशचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. 

जगावर ओढावलेल्या कोरोनाव्हायरस विरोधातील युध्दजन्य स्थितीत माजी सैनिक राज्यात आरोग्य व पोलीसयंत्रणेमध्ये मोठ्या संख्येने सेवा देत आहेत कोरोना विषाणू विरुध्दचे हे जागतिक महायुध्द निर्णायक टप्प्यात असून शिस्तबध्द पध्दतीने  वैद्यकीय निर्देशांचे काटेकोरपणे पालन केल्यास लवकर जिंकता येईल,असे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button