breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रियविदर्भ

अमित शाह यांचे ‘ऑपरेशन लोटस’ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे दिले प्रत्यूत्तर!

नागपूर : भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असेही अमित शहा म्हणाले. अमित शहांच्या कोकण दौऱ्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्सची चर्चा सुरू झाली आहे. आता अमित शहांच्या दाव्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती. मी काही तिथे नव्हतो, मी ज्योतिषी नाही, असे अजित पवार म्हणाले.

तसेच, राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकार पडण्याचा दावा देखील फेटाळून लावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button