breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

महाबळेश्वर पर्यटनासाठी खुले, नियम-अटींचे करावे लागेल पालन

सातारा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर पर्यटनासाठी खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले असून पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे महाबळेश्वर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. तसेच, तसेच तेथील पर्यटन व्यवसायही ठप्प झाला होता. आता अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू सर्व सेवा सुरळीत होत असताना अनेक ठिकाणच्या पर्यटन व्यवस्थाही खुल्या होत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत. वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडे सवारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच पाचगणी येथेही नौकाविहार करता येईल. महाबळेश्वर, वेण्णा, पाचगणी व्यतिरिक्त बाकीची पर्यटनस्थळं बंदच राहतील. त्याचबरोबर बंद असलेल्या पर्यटनस्थळांच्या परिसरात घोडेस्वारी करण्यास बंदी असेल.

  • पर्यटनासाठी काय असतील नियम?
  • घोडेस्वारीसाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांची वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक आहे.
  • व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडेचालक आणि मालक या दोघांची कोरोना चाचणी केलेली असने गरजे आहे.
  • वेण्णा येथे नौकाविहार करायचे असल्यास एका बोटीत 6 पर्यटक आणि 1 घोडेस्वार असे एकूण सात जणच बसू शकतील.
  • बोट सॅनिटाईझ करणे बंधनकारक असेल.
  • एका बोटीच्या दिवसभरातून फक्त दोनच फेऱ्या करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
  • जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सहली अथवा ग्रुपने बोटींग करण्यास मनाई असेल.
  • टॅक्सीमध्ये प्रवास करताना पर्यटकांना एका वेळी तिघांना प्रवास करता येईल. तसेच टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यात पडदा असणे बंधनकारक आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button