breaking-newsमहाराष्ट्र

अमरावतीत ट्रकचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी 300 किलो गांजा पकडला

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी 3 क्विंटलपेक्षा जास्त गांजा जप्त केला. वलगाव पोलीस ठाण्यासमोर नाका बंदी दरम्यान एका मालवाहू ट्रकमधून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाई 33 लाखांच्या गांजासह जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हैदराबादच्या निजामाबाद येथून एक ट्रक अमरावती शहरात गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. हा ट्रक नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असल्याची माहिती होती. त्यामुळे नागपुरी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, ट्रक पुढे जात असल्याचं पाहून नागपुरी गेट पोलिसांनी वलगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

वलगाव पोलिसांनी सापळा रचत या ट्रकला थांबवलं. या ट्रकमधून तब्बल 3 क्विंटल गांजाची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं. वलगाव पोलिसांनी जवळपास 33 लाखांचा 3 क्विंटल गांजा आणि 12 लाखांचा ट्रक असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला .

याप्रकरणी मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद फारक (वय 25), सलीम मुल्ला मुजफ्फर मुल्ला (वय 35), शेख सोयब शेख हसन (वय 25), अनुज नवजीरे या चार जणांना अटक केली. हे सर्वजण अमरावतीचे राहणारे आहेत. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

सदर ट्रक मधील गांजा हा परतवाडा येथे घेऊन जात असल्याची माहिती आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी कशी होते, हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सदर कारवाई वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या निरिक्षणाखालील पथकाने केली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button