breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभियंता महिलेशी अश्लिल चाळे करून अतिप्रसंगाचा प्रयत्न

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – “खूप दिवसांपासून तुझ्यावर प्रेम करत आहे. परंतु, तु मला कसलाच प्रतिसाद देत नाहीस. आता पाहतो तु कसा प्रतिसाद देत नाही ते”, असे म्हणून एका नराधमाने आयटी अभियंता महिलेशी अश्लिल चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काल रविवारी (दि. 20) चारच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिनाक नेपाल मुजुंदार (वय 30, रा. एक्झरबिया सोसायटी, मारुंजी, मूळगाव त्रिपुरा) याच्यावर भादवीक 354, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तक्रार दाखल होताच त्याने हिंजवडीतून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. याप्रकरणी आयटी अभियंता महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी अभियंता महिला नोकरी करत असल्याने पिनाक हा त्यांच्या संपर्कात आला. पिनाकने महिलेला चेन्नई येथून बोलावून घेतले. त्यावर महिला पिनाकच्या मारुंजी येथील राहत्या घरी आल्या. पिनाकने त्यांचा हात हातात धरून “तुझ्यावर खूप दिवसांपासून प्रेम करत आहे. परंतु, तु मला कसलाच प्रतिसाद देत नाही. आता पाहतो तु मला कसा प्रतिसाद देत नाही”, असे म्हणून त्याने महिलेला मिठीत पकडले. त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी अश्लिल कृत्य करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यावर महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात पिनाकच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली, अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रुपनर यांनी सांगितली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button