breaking-newsमुंबई

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ व सिग्नलची देखभाल, दुरुस्ती आणि इतर महत्वाची अभियांत्रिकी कामे उद्या रविवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरी सेवेच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत.

मेगाब्लॉकमुळे उद्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यानची उपनगरी सेवा सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान बंद राहणार असून या कालावधित हार्बरच्या प्रवाशांना मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा रेल्वेने दिली आहे.


मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सॅडहर्स्ट रोड ते विद्याविहार या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील उपनगरी सेवेची वाहतूक या कालावधीत जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहे. हार्बरवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी या रेल्वे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरची सेवा सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या काळात बंद राहणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत, असे रेल्वेने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button