breaking-newsमनोरंजन

अभिनेता राणा डग्गुबतीच्या वडिलांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता राणा दग्गुबाती याचे वडिल सुरेश बाबू यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

सुरेश बाबू दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जातात. आयकर विभागाने त्यांच्या हैदराबादच्या निवासस्थानी व त्यांच्या रामानायडू या फिल्म स्टुडिओमध्ये छापा टाकला आहे. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रेही तपासली व काही कागदपत्रे जप्त देखील केल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून ही कारवाई सुरु होती. अशी माहिती टाईम्स नाऊ या वेबसाईट दिली आहे.

सुरेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. कारवाई झाली तेव्हा सुरेश बाबू देशात नव्हते. तसेच आयकर विभागाच्या रडारवर देशातील अन्य मोठे निर्माता देखील असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button