breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

UP Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर,योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार

उत्तर प्रदेश | प्रतिनिधी 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 107 उमेदवार जाहीर केले आहेत. या सगळ्यात भाजपने मात्र एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हो अयोध्यातून निवडणूक लढतील. पण जेव्हा यादी जाहीर झाली तेव्हा त्यात असं समोर आलं की, योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढतील.

भाजपने 107 उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी 83 विद्यमान आमदार होते. याच 83 आमदारांपैकी 63 आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर 20 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

कोण कुठून लढणार?

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने नोएडाचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना तिकीट दिले आहे. तर नंदकिशोर गुर्जर यांना लोणीतून तिकीट देण्यात आले आहे. गौतम बुद्ध नगरच्या तीनही जागांवर भाजपकडून केवळ विद्यमान आमदारालाच तिकीट मिळाले आहे.

नोएडा विधानसभेचे विद्यमान आमदार पंकज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरी विधानसभेतून तेजपाल नगरला भाजपचा उमेदवार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेवर विधानसभेचे विद्यमान आमदार धीरेंद्र सिंह यांना तिकीट मिळाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button