breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहिद कर्मचा-याच्या कुटुंबियांना मिळणार न्याय, आयुक्तांचा सकारात्मक निर्णय

  • राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली होती मागणी
  • आर्थिक मदत करण्याचा आयुक्तांनी घेतला निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दापोडी येथे पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या कर्मचा-याला वाचवण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनातील एक आणि ठेकेदाराकडील एक अशा दोन कर्मचा-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना पालिकेने आर्थिक मदत करावी, जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी मागणी केली होती. ही मागणी विचारात घेऊन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्ताधारी भाजपचे पालिकेतील पदाधिकारी यांनी मृतांच्या कुटुबियांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेजचे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्यात ठेकेदाराचे कर्मचारी नागेश जमादार मातीच्या ढिगा-याखाली अडकले. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशामक विभागातील फायरमन विशाल जाधव यांनी शर्तीचे प्रयत्न केले. हे काम करताना मातीचा ढिगारा अंगावर पडून विशाल जाधव हे देखील ढिगार-याखाली अडकले. यात ठेकेदाराकडील नागेश जमादार आणि विशाल जाधव यांना प्राण गमवावे लागले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनातील दोन कर्मचारी निखील गोगावले व सरोज फुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

महापालिकेतील अग्निशामक दलाचे फायरमन विशाल जाधव आणि ठेकेदाराकडील कर्मचारी नागेश जमादार या निधान पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना पालिकेतर्फे आर्थिक मदत देण्यात यावी. विशाल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्याला पालिकेत नोकरी द्यावी. जखमी निखील गोगावले व सरोज फुंडे यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी मागणी कार्यकर्ते संदीप काटे यांनी सोमवारी (दि. 2) पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. काटे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आयुक्त हर्डीकर आणि पालिकेतील भाजपचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावर चर्चा केली.

पालिका अशी करणार मदत

यात अग्निशामक दलाचे शहीद कर्मचारी विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांच्या पत्नीला पालिकेच्या प्रशासकीय सेवेत नोकरी देण्याचेही मान्य केले. ठेकेदाराकडील कर्मचारी नागेश जमादार यांना देखील ठेकेदाराकडून 2.5 लाख रुपये मदत मिळण्याची हमी घेतली. मात्र, ही मदत मोठ्या प्रमाणात कशी मिळवून देण्यात येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असाही निर्णय घेतला आहे. याशिवाय, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी देखील पालिकेने उचलली आहे. त्यामुळे काटे यांच्या मागणीचा विचार करून प्रशासनाने कार्यतत्परता दाखविली आहे. काटे यांच्या वतीने प्रशासनाचे आभार माणण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button