breaking-newsताज्या घडामोडी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

शिर्डी – दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले होते. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव आणि गोरगरीबांच्या विकासासाठी आणि शिक्षणाबद्दलचे योगदान असो किंवा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील यशासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो, त्यांचे कार्य तरुण पिढ्यांना प्रेरणा देईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.

पंतप्रधानांनी यावेळी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘मी आधीच वेळ दिला होता. मात्र कोरोनामुळे येथे येऊ शकलो नाही. परंतु कोरोनामुळे आज व्हर्चुअल पध्दतीने पुस्तकाचे प्रकाशन करतोय. तसेच मी त्यांचे काम पाहिले आहे. समाजासाठी राजकारण आणि सत्ता हे पथ्य मी नेहमी पाळले. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले आहे. देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी अनेक योजना राबविल्या. शेतीत नवीन आणि जुन्या पध्दतीचा ताळमेळ ठेवणे गरजेचे आहे. साखर कारखान्यातून आता इथेनॉलही उत्पादन होत आहे. इथेनॉलचा वापर वाढला की बाहेर जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात येईल’, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बाळासाहेबांचे आत्मचरित्र तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल, असेही ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील या सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यांनी विखेंबद्दल आपले विचार व्यक्त केले. तर प्रवरानगर येथे मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुभाष भामरे, हरीभाऊ बागडे, हर्षवर्धन पाटील, सुनंदा पवार, प्राजक्त तनपुरे, पोपटराव पवार, सुरेश धस, वैभव पिचड, बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे, खासदार प्रितम मुंडे, धैर्यशील माने हे उपस्थित होते.

दरम्यान, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तारही करण्यात आला. या संस्थेचे नामांतर लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे करण्यात आले आहे. १९६४ साली नगरच्या लोणी इथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button