breaking-newsताज्या घडामोडीपुणे

…अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन!

  • ठळक मुद्देलोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले.
  • पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
  • भाषण थांबवून, पोडियमपासून बाजूला होतं स्टेजवर येऊन मोदींनी नागरिकांना अभिवादन करणं लक्षवेधी ठरलं.

पुणे – गेल्या 70 वर्षांपासून ‘एक देश, एक संविधाना’च्या आड 370 कलम येत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या गप्पा खूप झाल्या. पण कृती कोणी केली नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणताच पुणेकरांनी मोदी मोदीचा जयघोष केला. लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले.

पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी मोदी अशा घोषणा नागरिक सगळ्याच ठिकाणी देत असतात, पण अशा पद्धतीने भाषण थांबवून, पोडियमपासून बाजूला होत, स्टेजवर येऊन अशा पद्धतीने मोदींनी नागरिकांना अभिवादन करणं लक्षवेधी ठरलं.

370 कलम काढून टाकल्याने देश एकसंध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले, तसेच हे कलम काढून टाकणे जम्मू काश्मीर, लढाखच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते असेही ते म्हणाले. मोदींचे आगमन होताच भव्य हाराच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थित नागरिकांनी मोदींना अभिवादन केले.

ANI✔@ANI

#WATCH Maharashtra: Prime Minister Narendra Modi bows down before the people while speaking about the abrogation of Article 370, at a public rally in Pune. #MaharashtraAssemblyPolls5198:11 PM – Oct 17, 2019Twitter Ads info and privacy

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button