breaking-newsमनोरंजन

अन्‌ असिन बनली कोट्यवधीची मालकीन

बॉलिवूडमध्ये आपले करिअर जोरावर असतानाच काही अभिनेत्रींनी लग्न केले आणि बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. यातील एक नाव म्हणजे गजनी फेम अभिनेत्री असिन. साऊथ चित्रपटातून असिनने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि बॉलिवूडपर्यंत यशस्वीपणे मजल मारली. तिने “नरेन्द्रन मकान जयकंथान वाका’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पर्दापण केले. ती तेव्हा फक्त 15 वर्षांची होती.

असिनने लहानपणापासूनच तमिळ, तेलगू, मल्याळम असा विविध प्रादेशीक भाषांमध्ये काम केले आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन यासारख्या मोठ्या स्टार्ससोबतही काम केले. असिनने आमिर खानसोबतच्या गजनी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

तिने त्यानंतर अनेक हिट चित्रपट दिले आणि मायक्रोमॅक्‍सचा को फाऊंडर राहुल शर्मासोबत 2016 मध्ये विवाहबद्ध झाली. साखरपुड्यानंतर असिनची इंगेजमेंट रिंग खूप चर्चेत होती. या रिंगची किंमत सुमारे 6 कोटी एवढी होती. राहुल शर्मा हा बिजनेजमन असून तो बॅडमिंटन उत्तम खेळतो. 2014 मध्ये मायक्रोमॅक्‍सचा रेवेन्यू 10 हजार कोटी एवढा होता. राहुल शर्मा मायक्रोमॅक्‍स या कंपनीचा को-फाऊंडर असून असिन लग्नानंतर पतीचा 2000 कोटींचा बिजनेस सांभाळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button