breaking-newsपुणे

शारिरीक संबंधास नकार दिल्याने पुतण्याकडून चुलतीची हत्या ; जून्नरमधील घटना

पुणे –  शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पुतण्याने चुलतीची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार आज (बुधवारी) जुन्नर तालुक्यातील साकोरी येथे घडला. देविदास खंडू साळवे (वय 54, रा. साकोरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार शिवाजी गेनू साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संगीता देविदास साळवे (वय 50 रा. साकोरी, ता. जुन्नर) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीने घटनेनंतर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास हे साकोरी गावचे पोलीस पाटील आहेत. तर त्यांच्या पत्नी संगीता अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होत्या. मंगळवारी रात्री संगीता घराबाहेरच्या ओसरीत झोपल्या होत्या. तर देविदास आणि त्यांची मुले घरात झोपले होते. पहाटे अचानक मला वाचवा असा आवाज येऊ लागला. देविदास आणि त्यांच्या मुलांनी बाहेर येऊन पहिले असता संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या जवळ देविदास यांच्या पुतण्या गेनू धारदार शस्त्र घेऊन उभा होता. देविदास यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. पुतण्या गेनू याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्याला मी नकार दिला. म्हणून त्याने चिडून माझ्यावर धारदार शास्त्राने वार केले, असे जखमी अवस्थेतील संगीता यांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button