breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनेकांची आमंत्रणे धुडकावून अमित गोरखे यांच्या घरी फडणवीसांची सदिच्छा भेट

  • गोरखे परिवाराच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे यथोचित स्वागत
  • स्नेहभोजनाच्या आस्वादानंतर रंगल्या सामाजिक आणि राजकीय गप्पा

पिंपरी / महाईन्यूज

कर्तव्यचातुर्य अंगी असणा-या कार्यकर्त्याची नेत्याला नेहमी पारख असते असे उगीच म्हटले नाही. कारण, हीच पारख अमित गोरखे यांची राजकीय कार्यकीर्द झळकण्यास फायदेशीर ठरली आहे. त्यांनी समाजकार्याला वाहून घेण्याची धमक दाखविल्यामुळेच पक्षाचे उच्च नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोरखे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे. कधीही विश्वासाला तडा जाऊ न देता अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर राहून आपल्या कार्याची छबी उमटविल्यामुळे फडणवीसांनी शहरातील असंख्य पदाधिका-यांची आमंत्रणे धुडकाऊन गोरखे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी मोर्चातर्फे शुक्रवारी (दि. 22) प्रदेश पदाधिकारी कार्यसमिती बैठक आणि मेळाव्याचे भोसरी येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर फडणवीस यांनी थेट अमित गोरखे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी गोरखे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गोरखे कुटुंबियांसमवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन त्यांनी स्थानिक राजकीय व सामाजिक मुद्यांवर बराचवेळ चर्चा केली. यावेळी माजी मंत्री व भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची उपस्थितीत होती.

अमित गोरखे यांच्याप्रती असलेला विश्वास आणि आपेक्षा यामुळेच फडणवीस यांनी शहरातील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे अमंत्रण डावलून अमित गोरखे यांची भेट घेतली. यावेळी भगवान श्रीरामाची मूर्ती व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचारधन अर्थात त्यांच्या साहित्याचा संच भेट देऊन गोरखे परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अमित गोरखे यांच्या मातोश्री व भाजपाच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी देखील पक्षाचे महिला संघठन मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांच्या भेटीमुळे गोरखे कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झाला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी इथल्या राजकीय व सामाजिक विषयांची माहिती घेतली. बराच वेळ या मुद्यांवर आमची चर्चा देखील झाली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन माझ्या कुटुंबासाठी दिलेला बहुमुल्य वेळ हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

– अमित गोरखे, प्रदेश सचिव, भाजपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button