breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रिक्षा बसलेल्या प्रवाशाची लूटमार, चालकासह तिघांना पोलिसाची अटक

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात रिक्षातून प्रवास करणा-या नागरिकांची दिवसा ढवळ्या लूटमार होवू लागली आहे. चालकांना अन्य साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयसमोर घडली.

रिक्षाचालक कपिल यशवंत खिलारे (वय 43, रा. दत्तवाडी), विजय फक्कड ढावरे (वय 31, रा. लक्ष्मी नगर, दत्तवाडी) आणि अब्दुलरझाक हुसेन भोला (वय 22, रा. बाबाखान वस्ती, वारजे) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुळशी तालुक्‍यातील वरसगाव येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रविवारी दुपारी स्वारगेट येथून पुणे स्टेशन येथे निघाला होता. त्यावेळी रिक्षाचालक खिलारे फिर्यादीस पुणे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वीस रूपये घेतो असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी पैसे देण्यास तयार झाले. फिर्यादी रिक्षामध्ये बसल्यानंतर काही अंतरावरच ढावरे व हुसेन हे दोघेजणही रिक्षामध्ये बसले.

रिक्षा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयासमोर आली. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या दोघांनी फिर्यादीस दमदाटी व शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. या प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचा क्रमांक शोधून रिक्षाचालकाचा तपास केला. त्यानंतर रिक्षाचालकासह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button