breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

अनिल अंबानी यांना ईडी कडून समन्स जारी

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यानंर ईडीने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना समन्स जारी केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स कंपनीचा देखील समावेश आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनिल अंबानी यांना सोमवारी मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांनी प्रकृती चांगली नसल्याचे कारण देत चौकशीसाठी हजर होण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीकडून त्यांना चौकशीसाठी नवीन तारिख देण्यात आली आहे. रिलायन्स समूहाच्या कंपन्यांनी येस बँकेकडून जवळपास १२,८०० कोटींचे कर्ज घेतले होते. ते त्यांनी परत केलं नसल्याचं म्हटलं जात आहे… 

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत सांगितले होते की, अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप, एस्सेल ग्रुप, आयएलएफएस, डीएचएफएल आणि वोडाफोन या ग्रुपने आर्थिक संकटात साडलेल्या येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या सर्व मोठ्या कंपन्यांनी येस बँकेकडून कर्ज घेतले आणि ते परत करु शकले नाहीत अशा कंपन्यांच्या प्रवर्तकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button