breaking-newsपिंपरी / चिंचवड

दापोडी दुर्घटना : जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत आणि पत्नीला मनपात नोकरी

  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला निर्णय
  • राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांनी मानले आभार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेज पाईपलाईन भूमीगतीकरणासाठी खोदलेल्या खड्यात ठेकेदाराचे कर्मचारी नागेश जमादार मातीच्या ढिगा-याखाली अडकले. त्यांना वाचवताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागातील फायरमन विशाल जाधव आणि जमादार दोघांचा अंगावर माती पडून मृत्यू झाला. जाधव यांना पालिकेकडून आर्थिक मदत देऊन त्यांच्या पत्नीला नोकरीत सामाऊन घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली होती.

काटे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आयुक्त हर्डीकर आणि पालिकेतील भाजपचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावर चर्चा करून सहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घटना घडून महिना उलटला तरी मनपा प्रशासन निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीसह अन्य पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणीही केली.

अंतता, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहीद कर्मचारी जाधव यांना संबंधित ठेकेदाराकडून 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांच्या पत्नी यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत नोकरी देण्याचाही निर्णय त्यांनी जाहीर केला. आयुक्त हर्डीकर यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर कार्यकर्ते संदीप काटे यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.

आयुक्तांनी असा घेतला होता निर्णय

घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाचे शहीद कर्मचारी विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपये आर्थिक मदत मिळवून देण्याचा निर्णय आयुक्त हर्डीकर यांनी घेतला होता. तसेच, त्यांच्या पत्नीला पालिकेच्या प्रशासकीय सेवेत नोकरी देण्याचेही मान्य केले होते. ठेकेदाराकडील कर्मचारी नागेश जमादार यांना देखील ठेकेदाराकडून 2.5 लाख रुपये मदत मिळवून देण्याची हमी दिली होती. याशिवाय, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी देखील पालिकेने उचलली असेही सांगण्यात आले होते. मात्र, निर्णय घेतल्यानंतर त्यावर कसल्याच प्रकारची हालचाल प्रशासन करत नव्हते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button