breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपीला बोईसरमध्ये अटक

जळगाव: जळगाव जेलमधून फरार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांमधील एका आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी बोईसर येथील सरावली परिसरात रुंदावन सोसायटीमध्ये 4 दिवसांपासून राहत होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे. गौरव विजय पाटील असं फरार आरोपीचे नाव आहे. तीन आरोपी 25 जुलैला जळगाव येथील जेलरला पिस्तुलचा धाक दाखवत तेथून फरार झाले होते. या तिघां आरोपींपैकी कुख्यात आरोपीला पकडण्यात बोईसर पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. पालघर अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर आरोपी सरावली येथील वृंदावन सोसायटीमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळालेली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि कर्मचाऱ्यांनी सरावली येथे सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्यांमध्ये ही या आरोपीवर हाफ मर्डर, सशस्त्र दरोड्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी फरार झाल्यापासून जळगाव पोलीस यांचा शोध घेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button