breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत होर्डिंग्ज काढणा-या ठेकेदारावर महापालिकेची मेहेरबानी

– एक कोटीच्या मूळ निविदेत अडीच कोटी वाढीव तरतूद  

– स्थायीचे सदस्य राजेंद्र गावडे व राजू मिसाळ यांनी दिली उपसुचना 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिग्ज काढण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने निविदा काढून मे. गणेश एंटरप्राईजेस यांना एक कोटी रुपयात कामाचे आदेश ठरावाद्वारे स्थायी समितीने दिले. त्या कामात वाढीव तरतूद करुन तब्बल अडीच कोटी रुपयाची वाढ करीत त्याची उपसुचना काढण्यात आलेली आहे. त्यामुळे 50 लाखाएेवजी तबब्ल 2 कोटी 50 लाखाच्या वाढीव तरतुदीची उपसुचनेला मान्यता दिली आहे. त्या ठेकेदारावर स्थायी समितीचे पदाधिका-यांनी मेहेरबानी दाखवित थेट पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा आरोप माजी नगरसेवक माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,   आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत सध्या जाहीरत फलक, होर्डींग्ज काढणेची कारवाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हे अनाधिकृत होर्डींग्ज काढणेसाठी मा. स्थायी समिती सभा कार्यक्रम पत्रिका ८८ दि. ५/११/२०१८ विषय क्र. ४४, ठराव क्र. ३६०५ अन्वये र.रु. ३ कोटी ५० इतकी वाढीव तरतूद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

 शहरामध्ये अनाधिकृत बांधकामांसाठी मनपा मिळकत धारकांना नगररचना अधिनियम ५३,५६ अन्वये ते अनाधिकृत बांधकाम  काढून घेण्याबाबत नोटीस देते. अथवा त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करुन ते बांधकाम पाडून टाकते. त्याच धर्तीवर सदरची अनाधिकृत होर्डींग्ज ज्यांनी लावलेली आहेत. त्यांना नोटीसा बजावून ती काढून टाकणेबाबत कळविणे गरजेचे आहे. व जर त्यांनी ती मुदतीत काढून टाकली नाहीत तर त्यांच्यावर मनपामार्फत अतिक्रमण कारवाई करुन ती काढून टाकणे आवश्यक आहे.

परंतु उपरोक्त स्थायी समितीच्या ठरावामध्ये मूळची निविदा १ कोटी रकमेची मे. गणेश एंटरप्राईजेस यांना कामाचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये ऐनवेळचा विषय ५० लाखाचा मंजुर करण्यात आला. त्यामध्ये प्रसार माध्यमांमधून अनाधिकृत होर्डींग्ज काढण्याकरीता दिड कोटीचा खर्च अशा आशयाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या मात्र याच सभेत याच विषयाला स्थायी समिती सदस्य राजेंद्र गावडे व राजू मिसाळ यांनी उपसुचना देऊन र.रु. ५० लाखाऐवजी २ कोटी ५० लाखला मंजुरी घेतली. हा करदात्या नागरीकांच्या तिजोरीवर दरोडाच आहे. त्यामुळे  थेट मनपामार्फतच अनाधिकृत होर्डींग्ज काढून टाकणेबाबत ३ कोटी ५० लाख रुपये मनपा खर्च करणार आहे. म्हणजे अनाधिकृत होर्डींग्ज लावून मनपाचे उत्पन्न बूडवून ठेकेदार नफा कमविणार व ते अनाधिकृत होर्डींग्ज मनपा स्वत:च्या खर्चाने काढणार हे म्हणजे सर्वसामान्य नागरीकांना भरलेल्या करांच्या पैश्यावर सरळ सरळ दरोडा टाकण्याचाच प्रकार आहे.

या ठरावाची अंमलबजावणी न करता, शहरातील अनाधिकृत मिळकतींना नोटीसा देऊन त्या काढण्याच्या सुचना दिल्या जातात.  त्यानूसार अनाधिकृत होर्डींग्ज ठेकेदारांना नोटीसा बजावण्यात याव्यात.  तरीही न काढल्यास मनपामार्फत ते होर्डिंग्ज काढण्यात यावेत.  त्यांचा खर्च आणि  दंड संबंधित ठेकेदारांकडून वसूल करावा, त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button