breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत मंदिर बांधकामावरुन नगरसेवकांची भूमिका दुटप्पी

  • नागरिकांची भावना आणि श्रध्देमुळे नगरसेवकांना स्पष्ट भूमिका घेण्यास अडचण
  • मंदिरेाची बांधकामे करण्यास नियमांत शिथिलता आणू – महापाैरांची भूमिका

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात मंदिर हा नागरिकांच्या भावना आणि श्रध्देचा विषय आहे. त्या अनधिकृत मंदिराच्या बांधकामावर आज (शुक्रवारी) महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्या बांधकामामुळे तीन मजुरांचा हकनाक बळी जावूनही त्याचे सोयर-सुतक लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसून आले. त्याशिवाय त्या अनधिकृत मंदिराच्या बांधकामास विरोध नसल्याचे सांगत एक प्रकारे त्यांनी त्या बांधकामाचे समर्थन केले आहे.   

पिंपळे गुरव येथील अनधिकृत मंदिराच्या बांधकाम कोसळून तीन मंजूरांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, निर्मूल विभागाने गुरुवारी (दि.21) कारवाई करून मंदिर जमीनदोस्त केले. तर, या दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिका-यांची चौकशीही समितीही नेमण्यात आली आहे.  पवना नदीलगत या महादेव मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम नोव्हेबर 2018 पासून सुरू होते. जुन्या मंदिराच्या मागील बाजूस अनधिकृतपणे हे दगडी बांधकाम करण्यात येत होते. मंदिराचे दगडी बांधकाम पूर्ण होऊन त्या समोरील व बहुतालचे दगडी सभामंडपाचे काम सुरू असताना बुधवारी (दि.20) दुपारी अचानक ते कोसळले. त्यात तीन निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला. तर, आठ जण जखमी झाली होते.

जिवघेण्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. पालिकेने 16 नोव्हेंबर 2018 ला नोटीस दिली होती. स्वत:हून 24 तासाच्या आत बांधकाम काढून घेण्याचे नोटीशीत बजावले होते. तरीही तब्बल 3 महिने त्या बांधकामाकडे पालिकेने दुर्लक्ष केले. त्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर पालिकेने तातडीने कारवाई करून हे मंदिर जिमनदोस्त केले. दरम्यान, याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व सहशहर अभियंता राजन पाटील यांची चौकशी समिती नेमून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संबंधित प्रकरणी दोषी अधिका-यांसह आयुक्तांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी मंदिर दुर्घटनेतील ठेकेदार, पालिकेचे अधिका-यांची चाैकशी करा, परंतू, मंदिराच्या बांधकामाला विरोध नसल्याचे सांगितले. नगरसेवक शशिकांत कदम यांनी या मंदिर बांधकामाच्या जिर्णाेध्दाराचे काम लोकवर्गणीतून स्थानिक नागरिकांनी सुुरु केले होते, त्या घटनेचे राजकारण करु नये, असे सांगितले. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी शहरातील सर्व मंदिराचे सर्वेक्षण करा, त्यांना सार्वजनिक जागेत मंदिर बांधकामास परवानगी देण्याची मागणी केली. नगरसेवक अजित गव्हाणे यांनीही मंदिराला आमचा विरोध नसून आम्ही त्यात राजकारण करीत नसल्याचे सांगितले. तर त्या मंदिराच्या बांधकामातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी गोरगरीबांचे बांधकामे पाडण्यास आपणच सांगतो, नंतर त्या बांधकामास आपणच अधिका-याला नोटीस देण्याचे सांगतो. त्यानंतर संबंधित नागरिक आपल्याकडे आल्यानंतर त्या अधिका-यास कारवाई थांबविण्याच्या सुचना देतो, असा कारभार कित्येकजण करीत आहे. तसेच त्यामुळे अनधिकृत बांधकामावर दुटप्पी भूमिका घेणा-यांना त्यांनी आपल्या भाषेत सुनावले.

तसेच महापाैर राहूल जाधव यांनी मंदिर हा प्रत्येकांच्या भावना आणि श्रध्देचा विषय असल्याने सार्वजनिक जागेत मंदिराचे बांधकाम करण्यास बांधकाम नियमावलीत शिथिलता आणू, याविषयी सर्वपक्षीय बैठक घेवून आपण काम करु या, तसेच सर्वांच्या भावना जपूया असे त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button