breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई

पुणे – होलसेल साडी दुकानाद्वारे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी 29 लाख 14 हजार रूपयांचे मोबाईल उधारीवर घेऊन 10 मोबाईल दुकान धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही 20 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जबराराम मोबताराम राजपुरोहीत (28) आणि नैनसिंग मोबताराम राजपुरोहीत (24, दोघेही रा. गणेशपेठ पुणे मुळ रा. तिलोडा. ता. सायला, जि. जलोरे) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. राजेश विर सिंह (रा. कामठे चाळ, फुरसुंगी मुळ रा. कर्नाटक) आणि निलमसिंग दौलतसिंग (40, रा. सुलतान बाजार, हैद्राबाद) या दोघांची अटकपूर्व जामीनावर मुक्‍तता झाली आहे. फेब्रुवारी 2018 ते 6 मे 2018 दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत रजेश आसाराम चौधरी (29, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी चौधरी यांचे फुरसुंगी येथील शिवशक्‍ती चौक येथे मोबाइल शॉपीचे दुकान आहे. राजेश विर सिंह याने फिर्यादी तसेच अन्य दुकानदारांकडून कल्पना साडी सेंटर नावाने होलसेल व्यापाऱ्यास त्यांच्या ग्राहकांसाठी बक्षीस म्हणून मोबाइल द्यायचे असल्याने मोबाईल उधारीवर खरेदी केले. अशी 29 लाख 14 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये तब्बल 253 मोबाईलची फसवणूक करण्यात आली. आरोपी असलेला राजेश विरसिंह याच्याकडून अटक केलेल्या दोघांनी विना बिल मोबाइल घेऊन त्या मोबाईलची विक्री केल्याचा प्रकार तपासामध्ये निष्पन्न झाला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button