breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक फाटा- मोशी महामार्ग रुंदीकरण : कोरोना काळातही आमदार महेश लांडगे यांची विकासकामे “सुसाट”

  • पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन लागले कामाला
  • भूसंपादनाला गती, मिळकतधारकांना प्रशासनाचे आवाहन

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रना सक्षम करतानाच आमदार महेश लांडगे यांनी रखडलेली विकासकामेही मार्गी लावण्याचे काम ‘सुसाट’ ठेवले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे- नाशिक महामार्ग रुंदीकरणातील नाशिक फाटा ते मोशी या पट्यातील अर्थात पिंपरी- चिंचवड हद्दीतील काम मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी नुकतेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर विकास विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. त्यावेळी भूसंपादनाचे उर्वरित काम मार्गी लावून निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने जाहीर आवाहन करीत रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या मिळकतधारक आणि शेतकऱ्यांना प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते मोशी इंद्रायणी नदी या राष्ट्रीय महामार्ग क्र ६०(जूना क्र.५०) येथील रस्ता बाधीत सर्व मिळकतधारकांना सुचित करणेत येते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक फाटा ते मोशी इंन्द्रायणी नदी या राष्ट्रीय महामार्ग क्र ६० (जूना क्र ५०) मधील रोशल गार्डनपासून स्पाईन रस्ता चौकापर्यंत(सुमारे ३३०० मीटर लांबी) तसेच स्पाईन रस्ता चौकापासून मोशी इंन्द्रायणी नदी पर्यंत (सुमारे ४२५० मीटर लांबी ) व ६१ मी रूंदीसाठी भूसंपादनाची कार्यवाही भूसंपादन अधिकारी विशेष घटक क्र.१ व २,संत तुकारामनगर, गोलमंडई मार्केट, वायसीएम हॉस्पीटल शेजारी, पिंपरी, पुणे-४११०१८ यांचेमार्फत चालू असून पुढील दोन महिन्यात सदर भागातील ६१ मी रूंद रस्त्याचा निवाडा जाहीर करणेत येणार आहे.

महापालिका प्रशासनाचे जाहीर आवाहन …
नाशिक फाटा ते मोशी या भागातील तमाम मिळकतधारकांना जाहिर आवाहन करणेत येते की, वर नमूद केलेल्या भागातील मिळकतधारक ज्यांनी प्रपत्र अ व ब च्या माध्यमातून महानगरपालिकेस ताबा दिला आहे अथवा ज्यांनी आजतागायत ताबा दिलेला नाही अथवा ज्यांनी महानगरपालिकेकडे प्रकरण दाखल केले आहेत अशा सर्व मिळकतधारकांना त्वरीत विकास ह्क्क प्रमाणपत्र/ विकास हक्क/चटई क्षेत्र निर्देशांक मिळणेबाबत महानगरपालिकेकडे जाहीर प्रकटनाच्या दिनांकापासून (26 जुलै 2020) एक महिन्याच्या आत प्रकरण दाखल करावे अथवा बाधीत जागेच्या मोबदल्याबाबत समतीपत्र दाखल करावे. अन्यथा ज्या मिळकतधारकांनी महानगरपालिकेकडे बाधीत जागेच्या मोबदल्याबाबत प्रकरण दाखल केले नाही अथवा समतीपत्र दाखल केले नाही त्या मिळकतधारकांना केवळ भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देय होईल सदरबाबत अधिक माहितीसाठी उपसंचालक, नगररचना व विकास विभाग, मुख्य कार्यालय, तळमजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११०१८ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button