पिंपरी / चिंचवड

हिंजवडीत येथे किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

दुचाकीवरून आलेल्या एकाने भिंतीला धडक दिली. त्यामुळे एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला गाडी हळू चालव असे सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने त्याच्या साथीदारांना बोलावून व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री दहा वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलजवळ हिंजवडी येथे घडली

अमोल रामदास शिंदे (वय 36, रा. न्यू इंग्लिश हायस्कूलजवळ, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बालाजी संपत, शाम चव्हाण, एक अल्पवयीन मुलगा आणि तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ त्यांची कार धूत होते. त्यावेळी आरोपी बालाजी दुचाकीवरून जोरात आला. त्याने फिर्यादी यांच्या कार समोरून जाऊन भिंतीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी बालाजी याला ‘गाडी हळू चालव’ असे सांगितले.

त्यावरून चिडलेल्या बालाजी याने त्याच्या चार मित्रांना बोलावले. एक अल्पवयीन मुलगा देखील आरोपींच्या मदतीला आला. आरोपींनी फिर्यादी यांना हाताने, काठीने आणि दगडाने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button