breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जात पडताळणीचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवा

– सम्यक विद्यार्थी आंदोलनची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

पदवी आणि पदव्योत्तर उमेदवारांनी आपले मूळ प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्याबाबतची मुदत वाढवून द्या, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने करण्यात आली. पुणे येथील आरोग्य भवन येथे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना निवेदन देण्यात आले. त्वरित या बाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड, पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम चव्हाण, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय बचुटे आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले की, ६ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार २० जानेवारी २०२१ पर्यंत पदवी आणि पदव्योत्तर उमेदवारांनी आपले मूळ प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्याबाबत मुदत वाढवून दिली होती. परंतु अजूनही विद्यार्थ्यांना समाज कल्याण मार्फत प्रमाणपत्र मिळत नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा अभाव आणि सीमित कालावधी या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. त्वरित अध्यादेश काढून प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत किमान एक महिना वाढ करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा, सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button