TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

“मी आत्महत्या…”; ‘हर हर महादेव चित्रपट’ बघून चाहत्याचे दिग्दर्शकाला पत्र

सुबोध भावे, शरद केळकर यांचा ‘हर हर महादेव’ चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदी चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सुबोध आणि शरदचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशाच एका चाहत्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकांना एक भावूक पत्र लिहलं आहे.

सुबोधने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे पत्र शेअर केलं आहे. ज्यात त्या चाहत्याने लिहलं आहे, ‘मी एक इंजिनियर आहे माझ्या वयक्तिक आयुष्याला कंटाळून मी आत्महत्या करणार होतो मात्र चित्रपटाचा ट्रेलर बघून वाटले महाराजांना बघून डोळे मिटावेत मात्र पूर्ण चित्रपट बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काय होते तरी आपले ध्येय साकारायचे, त्यामुळे माता खचुन जाणार नाही. आत्महत्या करणार नाही.’ अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या.

२५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.२५ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे सध्या सगळे कौतुक करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपटाचे कौतूक केले आहे. ‘हर हर महादेव’च्या बरोबरीने अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ आणि अजय देवगणचा ‘थँक गॉड’ असे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button