breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मशानभूमीत शव ठेवण्यासाठी तात्पुरत्या मर्चुरी रुमची उभारणी करा – गटनेते कैलास बारणे

पिंपरी / महाईन्यूज 

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅम्बुलन्समध्ये स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृत रुग्णास बराच वेळ थांबावे लागत आहे. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्स अडकून पड़त आहेत. नागरिकांना लवकर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना स्मशानभूमी बाहेर तासंतास ताटकळत बसून राहावे लागते. स्मशानभूमी बाहेर तात्पुरत्या मर्चुरी रूमची उभारणी करावी, अशी मागणी अपक्ष आघाडीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते कैलास बारणे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मर्चुरी रुममुळे मृतदेह त्या मर्चुरी रुममध्ये ठेवता येतील. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्स ही नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल. नागरिकांच्या अडचणी दूर होतील. त्यासाठी तत्काळ स्मशान भूमीबाहेर मर्चुरी रुमची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेवक कैलास बारणे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button