breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अण्णा… उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ झाली’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई |महा ई न्यूज़ |

 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून एक महिना होत आला तरीही अदयापही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. आज सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाकडून गुरुवारी मान्यता देण्यात आली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना याच सत्तास्थापनेवरुन टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ‘अण्णा, उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ झाली,’ असा टोला लगावत ट्विटवर अण्णांचा फोटो शेअर केला आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये हजारे यांचा झोपलेला फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आव्हाडांनी लिहिले की, ‘अण्णा उठा कामाला लागावे लागेल. रामदेव बाबा आहेत तयार. उठा उठा सत्ता गेली… आंदोलनाची वेळ आली..’ असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

image

Dr.Jitendra Awhad✔@Awhadspeaks

अण्णा उठा कामाला लागावे लागेल
रामदेव बाबा आहेत तयार
उठा उठा सत्ता गेली
आंदोलनाची वेळ आली

View image on Twitter

3,6368:19 PM – Nov 21, 2019

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button