breaking-newsआंतरराष्टीय

अझरला जागतिक दहशतवादी घोषित करावे

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना भारताचे आवाहन

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांची आणि या संघटनेचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानात असल्याची संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांना कल्पना असल्याचे सांगतानाच, या देशांनी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करावे, असे आवाहन भारताने शनिवारी केले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा जैशचा प्रमुख मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन यांनी गेल्या आठवडय़ात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) ठेवला होता.

यूएनएससीच्या सर्व १५ सदस्यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन एकमताने जारी केले होते, याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले. सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांना पाकिस्तानातील जैशच्या प्रशिक्षण शिबिरांची आणि मसूद अझहर त्या देशात असल्याची कल्पना आहे, असे ते म्हणाले.

१२६७ संयुक्त राष्ट्रसंघ र्निबध समिती अंतर्गत मसूद अझ रला जागतिक दहशतवादी घोषित करावे असे आम्ही यूएनएससीच्या सर्व सदस्यांना आवाहन करत आहोत, असे कुमार म्हणाले. तीन देशांच्या प्रस्तावाबद्दल यूएनएससीचा कुठलाही सदस्य १३ मार्चपर्यंत स्पष्टीकरण मागू शकेल. त्यानंतर त्याच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेशाची प्रक्रिया सुरू होईल, असे  सूत्रांनी सांगितले.

यादीत समावेश झाल्यास काय होणार?

मसूद अझरचा  जागतिक दशतवाद्यांच्या यादीत समावेश झाल्यास त्याच्यावर जगभरात प्रवासावर बंदी येईल, त्याची मालमत्ता गोठवली जाईल आणि त्याला शस्त्रे बाळगण्यावर बंदी घातली जाईल. अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात गेल्या १० वर्षांत होणारा हा चौथा प्रयत्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button