breaking-newsमनोरंजन

सतीश कौशिकनी केले ट्रकचे सिनेमागृह !!!

शहरांमध्ये वीकएंडला सिनेमा बघणे हे आता आपल्या नेहमीच्या आयुष्याचा भाग झाला आहे. शहरांमध्ये लेटेस्ट सिनेमे येतात, आणि भरपूर चालतात. साधारण कमावणारा व्यक्ती देखील सिनेमा बघण्यासाठी 100-150 रुपये खर्च करण्यास सहज तयार होतो, मात्र ग्रामीण भागात अजून ही चैन आलेली नाही. सिनेमा बघण्यासाठी शहरात येणे खूप महाग पडते. मात्र सिनेमा सारखी कलाकृती ही सगळ्यांसाठी खुली असावी आणि त्याचा आनंद सगळ्यांना घेता यावा यासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ट्रकला वातानुकूलित सिनेमाघराचे रूप देवून त्यांनी केवळ 30 रुपयात ग्रामीण भागातील नागरिकांना सिनेमा बघता येईल अशी सोय केली आहे.

मोबाइल डिजीटल मूव्ही थिएटर असे या चालत्या बोलत्या सिनेमाघराचे नाव आहे. नुकतेच चंदीगढ येथे झालेल्या ‘फिल्म फेस्टीव्हल’ मध्ये त्यांनी हा पहिलाच प्रयोग केला, आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अशा विविध ट्रक्‍स ना सिनेमाघरात परिवर्तित करण्याचे कार्य सुरु केले आहे. प्रत्येक ट्रकचे नाव एका प्रसिद्ध चित्रपटाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ‘मिस्टर इंडिया’, ‘बाहुबली’, ‘डॉन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button