breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, तर मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची निवड

मुंबई :  महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली नाहीये. संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. असं असलं तरी ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे. अजोय मेहता आता मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

ठाकरे सरकारमध्ये मेहता यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव असलेले अजोय मेहता हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती.

अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button