breaking-newsताज्या घडामोडीपुणे
अजून उमेदवार नाही, पण पुण्यात कॉंग्रेसचा प्रचार
पुणे-लोकसभा मतदारसंघात अद्यापही काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही, पण प्रचाराला कमी वेळ मिळेल म्हणून उमेदवाराविनाच काँग्रेसने आज दुपारी 4 वाजता कसबा पेठेतून प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. उमेदवार निश्चित नसताना त्या मतदारसंघात पक्षाने प्रचार करण्याची ही कचाचित पहिलीच वेळ असावी. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून नेमका प्रचार कोणाचा करायचा अशी चर्चा शहरत काँग्रेस भवन येथे रंगली आहे.