breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळात ‘पार्थ’च्या प्रचारासाठी ‘जय’ मैदानात

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला प्रचार धुमधडाक्यात सुरु केला आहे. आता पार्थच्या मदतीसह प्रचाराची रणनिती ठरविण्यासाठी लहान भाऊ जय पवारही मैदानात उतरले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्यासोबत प्रचारात जयही मतदारांच्या गाठीभेटी घेवू लागले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पावर हे येथून रणांगणात उतरले आहेत. पार्थ पवार यांनी उमेदवारी जाहीर होताच, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या. लहान-मोठ्या सभा, मेळावेही घेण्यास सुरुवात केली आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून पार्थ पवार यांनी आज पिपंपरी चिंचवड परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी पार्थ पवार यांच्या सोबतीला त्यांचे लहान बंधू जय पवार हेही हजर होते.

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेतच. त्याचसोबत, आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार हेही ठिकठिकाणी प्रचारात सामिल होत आहेत. त्यांच्या जोडीला आता पार्थ पवार यांचा लहान भाऊ जय पवारही उतरला आहे. त्यामुळे मावळमधील प्रचाराला आता वेगळीच रंगत आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button