breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापुर्वीच, पिंपरी-चिंचवडमधून शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी

राज्यात महाविकास विकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज (शनिवारी) त्यांचं जंगी स्वागत करत उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

रावेतमध्ये अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या मुलाचे रिसेप्शन पार पडले. त्या ठिकाणी अजित पवार यांनी उपस्थित राहिले आहेत. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाण्यापूर्वी ते पिंपरी चिंचवडमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने शुभेच्या देण्यात आल्या आहेत, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (दि.30 डिसेंबरला) दुपारी विधानभवन परिसरात होणार आहे. त्यावेळी शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून एकूण 36 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button