breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑटो क्‍लस्टरसमोरील रस्त्यावर एका मोटारीने अचानक पेट घेतला

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरसमोरील रस्त्यावर रविवारी (ता. 8) सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका मोटारीने अचानक पेट घेतला. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ऑटो क्‍लस्टरकडून सेंट मदर टेरेसा उड्‌डाण पुलाच्या दिशेने मोटार (एमएच 12 एचएल 300) येत होती. तेव्हा मोटारीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे चालकाने मोटार तातडीने रस्त्यातच उभी करीत मोटारीतून तो बाहेर पडला. त्यानंतर काही मिनिटांत मोटारीने पेट घेतला. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील संत तुकारामनगर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आग आटोक्‍यात आणली. या घटनेत मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोटारीच्या इंजिनमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button