breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बेळगावात कनसेचा उन्माद सुरुच, दुकानांवरील मराठी पाट्यांची तोडफोड, कर्नाटक-महाराष्ट्र बसेस रद्द

बेळगाव | कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे परिणाम बस सेवेवर पडल्याचे दिसू लागले आहे. कनसेचा बेळगावात उन्माद सुरुच असल्याने कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळांना दिले आहेत.

दरम्यान, कनसेचा भीमाशंकर पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. त्यानंतर, या घनटेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून बेळगाव बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्या कनसेने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले. कनसेचे भामटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बेळगावातल्या दुकानांवरील मराठी पाट्यांची तोडफोडही केली. या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ पावलं उचलली जातील, असे आश्वासन महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button