breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अजितदादांनी दिलेल्या शब्दाने शिंदे-मिटकरी यांच्यात विधान परिषदेसाठी चुरस

मुंबई | महाईन्यूज

विधानसभा निवडणूक उरकली असून सत्तावाटपही झाले आहे. आता विधानसभेतून हुकलेल्या नेत्यांना विधान परिषदेचे वेध लागलेले आहे. त्यासाठी अनेक जण आश्वासनांवर तर काही जण आपल्या ताकदीनुसार विधान परिषदेवर जाण्याची मागणी पक्षाकडे करत आहे. या जागांसाठी चांगलीच चुरस रंगणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पहिल्या जागेसाठी चुरस लागलेली आहे.

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झालेली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे असून या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. व या जागेसाठी राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी हेही इच्छूक आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button