breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंत्राटी व मानधनावर काम करणा-या कर्म-यांना सुविधा मिळवून देऊ – आ. महेश लांडगे

  • असंघटीत कामगारांनी एका छताखाली एकत्र यावे : मेधा थत्ते
  • कर्मचारी महासंघाचा थेरगावात कामगार मेळावा संपन्न
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत मानधनावर काम करणारे व ठेकेदारांकडे काम करणा-या सर्व विभागातील कंत्राटी व कर्मचा-यांना समान काम समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊ असे, आमदार महेश लांडगे यांनी कामगार मेळाव्यात सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने शनिवारी (दि. 15) थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्त करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, ज्येष्ठ कामगार नेत्या मेधा थत्ते, महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजूर्डे, सल्लागार ॲड. वैशाली सरीन, आबा गोरे, मनोज माछरे, संजय कुटे, महाद्रंग वाघेरे, चारूशिला जोशी, हनुमंत लांडगे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, मुकुंद वाखारे, दत्ता ढगे, विशाल भूजबळ, दीपक गळीतकर, महादेव बोत्रे, नंदकुमार घुले, पांडुरंग म्हस्के, सुनील विटकर, सविता निगडे,  निलेश जगताप, उत्तम गंगावणे, बंटी ठोकळ, वैभव देवकर, विजय मुंडे, उमेश बांदल, सुधीर वायदंडे, रमेश चोरघे, राजश्री गायकवाड, यमुना खंडागळे, विजया रोडे, वैशाली वळे आदींसह हजारो कामगार उपस्थित होते.
मेधा थत्ते म्हणाल्या की, असंघटीत कामागरांनी एका छताखाली एकत्र यावे. पिंपरी-चिंचवड महापालिका ठेकेदारांना, कर्मचा-यांना देण्यासाठी किमान वेतन, ईएसआय, साधन, मानधनाचे पैसे देते. तरीही ठेकेदारांकडून कर्मचा-यांना पुरेसे वेतन दिले जात नाही. समान काम समान वेतन मिळण्यासाठी आपण एका संघटनेच्या छताखाली कामगारांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
झिंजूर्डे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय, विद्युत, सुरक्षा, शिक्षण मंडळ, क्रीडा, मुख्य कार्यालय आणि इतर रुग्णालये तसेच इतर सर्व विभागातील मानधन, कंत्राटी पद्धतीने काम करणारे सुमारे चार हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. या कर्मचा-यांना कायम कामगारांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे. कायम कामगारांप्रमाणे गणवेश व इतर साधने मिळावीत, आठ तासांचे काम, साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा, ओळखपत्र, ईएसआयची वैद्यकीय सेवा आदी सेवा सुविधा कायम कामगारांप्रमाणे मिळाव्यात, यासाठी महासंघ प्रयत्नशील राहिल.
स्वागत मनोज माछरे यांनी केले. सुत्रंसचालन हनुमंत लांडगे  यांनी केले. आभार चारूशिला जोशी यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button