breaking-newsक्रिडा

संघातील ‘या’ सात परदेशी खेळाडूंच्या कामगिरीमुळे इंग्लंड विश्वविजेता

लॉर्डस क्रिकेट मैदानावर अतिशय रोमांचक अशा अंतीम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. विश्वचषक स्पर्धेमध्ये ४४ वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम अंतीम सामन्यामध्ये केला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सामन्याला अनेक कलाटणी देणाऱ्या घडामोडी मैदानात घडल्या. यामध्ये दोन्हीकडील खेळाडूंने सामन्याचे पारडे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या क्षणी सुपर ओव्हरमध्येही समान धावसंख्या झाल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. मात्र इंग्लंडने हा सामना जिंकला असला तरी आता चर्चा सुरु आहे ती इंग्लंडच्या संघांतील वैविध्यतेबद्दल. विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडच्या १५ जणांच्या संघामधील केवळ आठ खेळाडूच मूळचे ब्रिटनमधील आहेत. इंग्लंडच्या संघातील अनेक महत्वाचे खेळाडू इतर देशांमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले खेळाडू आहेत.

अगदी कर्णधार ईऑन मॉर्गनपासून ते सुपर ओव्हरमध्ये दमदार फटकेबाजी करणाऱ्या बेन स्टोक्स ते गोलंदाजी करताना सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरपर्यंत अनेक मुळच्या परदेशी खेळाडूंनी इंग्लंडच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलल्याचे दिसले. जाणून घेऊयात इंग्लंडच्या संघातील खेळाडू आणि त्यांचे मूळ देश कोणते आहेत याबद्दल…

ईऑन मॉर्गन (कर्णधार) (आर्यलंड)
जॉनी बेअरस्टो (ब्रिटिश)
आदिल रशीद (पाकिस्तान)
जो रुट (ब्रिटिश)
मोईन अली (पाकिस्तान)
जॉस बटलर (ब्रिटिश)
जेसन रॉय (दक्षिण आफ्रिका)
ख्रिस वोक्स (ब्रिटिश)
टॉम करन (दक्षिण आफ्रिका)
लियाम प्लंकेट (ब्रिटिश)
जोफ्रा आर्चर (वेस्ट इंडीज)
बेन स्टोक्स (न्यूझीलंड)
मार्क वूड (ब्रिटिश)
लिआम डॉवसन (ब्रिटिश)
जेम्स विन्स (ब्रिटिश)

दरम्यान दुसरीकडे न्यूझीलंडचा सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्यांना उप-विजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button