breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अजय देवगणने घेतली धारावीतील ७०० कुटुंबांची जबाबदारी

मुंबई | करोना व्हायरसशी लढण्यासाठी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी कोट्यवधींची मदत केली. फक्त पैशांचीच मदत नाही तर अनेक गरजूंच्या खाण्या- पिण्याचीही सोय अनेक सेलिब्रिटींनी केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये १.१० कोटींची मदत केलेल्या अजय देवगणने आता धारावी झोपडपट्टीमधील ७०० कुटुंबियांची जबाबदारी उचलली आहे. अजयने स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली.

अजयने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘सध्या धारावी हे करोना व्हायरसचं केंद्रस्थान झालं आहे. अनेक लोक सेवाभावी संस्थांच्या मदतीने तिथल्या लोकांना अन्नधान्य आणि हायजीनचे कीट देत आहेत. आम्ही ७०० कुटुंबियांची मदत करत आहोत. तुम्हीही मदतीसाठी पुढे यावं असं आम्ही आवाहन करतो.सध्या सोनू सूदच्या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. तो मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचं काम करत आहे. यासाठी त्याने बस सेवाही सुरू केली आहे. तो स्वखर्चाने मजुरांना त्यांच्या घरी सोडत असून प्रवासा दरम्यानचा खाण्या- पिण्याचा खर्चही तो करत आहे. अजयनेही सोनूच्या या कामाचं कौतुक करत म्हटलं की, ‘ सोनू तू परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी सोडण्याचं जे काम करत आहे ते एक उदाहरण आहे. तुला अशीच हिंमत मिळो.’

असं असलं तरी सोशल मीडियावर अजय देवगणला ट्रोलही करण्यात आलं होतं. सोनूप्रमाणे त्यानेही काही समाज कार्य करावं असा सल्ला त्याला देण्यात आला होता. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण सापडले आहेत. बुधवारी येथे १८ नवे करोना रुग्ण आढळले. यासोबत धारावीमध्ये एकूण करोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६३९ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button