पिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: नगरसेवक कुंदन गायकवाड यांची सतर्कता!

प्रभागातील सोसायट्यांना भेट : बाहेरुन आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईनचे आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाशी सकारात्मक समन्वय ठेवून प्रभाग क्रमांक १ मधील भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आपल्या प्रभागामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये नागरिकांच्या अडचणी लक्षात घेवून बाहेरुन आलेल्या नागरिकांनी स्वत: क्वॉरंटाईन व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत 451 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात दि. 10 मार्च रोजी राज्यातील पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सलग 12 रुग्ण सापडले होते. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर एप्रिलपासून पुन्हा शहरातील रुग्ण वाढीला सुरुवात झाली. बघता-बघता रुग्ण संख्येने साडेचारशेचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, असेही नगरसेवक गायकवाड यांनी म्हटले आहे.

          तसेच, शहरातील 451 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 191 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आजमितीला 253 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काही रुग्णांवर महापालिका तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केलेल्या सकारात्मक उपाययोजनांमुळे शहरातील रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. शहरातील कोरोना योद्धांच्या कार्याला सलाम केला पाहिजे, अशा भावनाही नगरसेवक गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी धर्मराज नगर येथील नागरिकांसाठी नगरसेवक गायकवाड यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचेही आयोजन केले होते.

नागरिकांनी काळजी घ्यावी…

शहरातील 22 ते 39 वयवर्षे असलेल्या 178 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 68 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 51 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 46 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोसायटी परिसरातील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button