breaking-newsमनोरंजन

अखेर शाहरुखच्या मुलीचे अभिनयात पदार्पण

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलेसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सतत उत्सुक ठेवणारी सुहाना यावेळी तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

https://www.instagram.com/suhanakhan143/?utm_source=ig_embed

सुहानाने आपल्या पहिल्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शॉर्ट फिल्म प्रकारातल्या या चित्रपटाचे नाव ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ असे आहे. या टीझरमध्ये सुहाना आपल्या मित्राबरोबर गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. या टीझरला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. एका दिवसात तब्बल २६ हजार नेटकऱ्यांनी या टीझरवर आपल्या प्रतिक्रीया देत शाहरुखच्या लेकीला तिच्या फिल्मी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button