breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अखेर कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या औषधाचा शोध लागला ?

अखेर कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या औषधाचा शोध लागला असल्याचा दावा ब्रिटीश वैज्ञानिकांनी केला आहे. या औषधामुळे कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांवर उपचार करता येणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. डेक्सामेथासोन या स्टेराइडमुळे कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात एक तृतीयांश घट झाली असल्याचाही वैज्ञानिकांनी दावा केला आहे..

डेक्सामेथासोनचा वापर २१०४ रुग्णांवर करण्यात आला. या रुग्णांची तुलना इतर सामान्य उपचार घेणाऱ्या ४३२१ रुग्णांशी करण्यात आली. या औषधाच्या वापरानंतर व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यू दरात तब्बल ३५ टक्के घट झाली असल्याचे समोर आलं आहे… तर, ज्या रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत होतं. त्या रुग्णांचा मृत्यू दरही २० टक्के घटला असल्याचं संशोधनात आढळून आलंय.

डेक्सामेथासोन  हे औषध फक्त गुणकारीच नाही तर परवडणारंही असल्याचं बोललं जात आहे…ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक पीटर होर्बी यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष हे आशादायी आहेत… या औषधामुळे मृत्यू दर कमी झाला तसेच ऑक्सिजनच्या मदतीने उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा फायदा झाला. त्यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांवर डेक्सामेथासोनचा वापर करायला हवा असं त्यांनी म्हटलंय. डेक्सामेथासोन औषध प्रचंड महाग नसून जगभरातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी याचा वापर करता येणे शक्य असल्याचंही त्यांनी म्हटलं. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी डेक्सामेथासोनचा वापर करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं.

त्यामुळे आता या औषधाबाबत भारत सरकार नेमकं कोणतं पाऊलं उचलणार हे पाहण महत्त्वाच आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button