breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षय कुमार याच्या बहुप्रतीक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बहुप्रतीक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरनंतर ९ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, ट्रेलरमध्ये दाखविल्यानुसार अक्षय कुमार हा गर्लफ्रेंड कियारा आडवाणीच्या कुटुंबीयांना भेटायला आलेला असतो. मात्र तिथे आल्यानंतर एक ट्रान्सजेंडर भूत त्याच्या शरीराचा ताबा मिळवतो. त्यानंतर अक्षयचे वागणे बोलणे पूर्णपणे बदलले असल्याचे पाहायला मिळते. अक्षयला या वेगळ्या भूमिकेत पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून तो ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे.

९ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. तसेच अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांसाठी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button