breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्रे निश्‍चित

  • सीबीएसई, आयसीएसईसह अन्य केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची सोय

पुणे – सीबीएसई, आयसीएसईसह अन्य केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशास अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत. येत्या सोमवारपासून विद्यार्थी या केंद्रांतून अर्ज भरू शकतील व अर्ज तपासून घेत अप्रुव्ह करून घेऊ शकतील. त्यासाठी मार्गदर्शन केंद्रांची नावे माहितीपुस्तिकेत नमूद करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी लगतच्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अकरावी प्रवेशासाठी अर्ज करावेत, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीचे सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.

केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यासाठी अकरावी प्रवेश समितीने नियमावली जाहीर केली आहे. सध्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून “भाग 1′ भरून घेतला जात आहे. सीबीएसई, आयसीएसई, एनआयओएस, आयजीएससीई, आयबी, आयजी या माध्यमांच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे.

यंदा “सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेमध्ये श्रेणी ऐवजी गुण दिले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे मुख्य पाच विषयांचे गुण गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जाणार आहेत. यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व द्वितीय भाषा या विषयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कॉम्प्युटरसह अन्य वैकल्पिक विषयांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही.

आयसीएसई माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षापत्र पाहून विषयाची खात्री करावी. त्यानुसार गट तपासले जातील. विद्यार्थी “ग्रुप 1′ व “ग्रुप 2′ एकत्रित किंवा “बेस्ट ऑफ फाईव्ह फॉम ग्रुप 1′ व “ग्रुप 2′ घेऊ शकतो; किंवा तिन्ही ग्रुप एकत्र करून संपूर्ण गुणांसह घ्यावेत. विद्यार्थी इंग्रजी विषयासह 5 विषयांत उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
एनआयओएस माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाप्रमाणे एकत्रित गुण भरावेत. विज्ञान शाखेत प्रवेशासाठी दहावीच्या परीक्षेत विद्यार्थी 35 टक्‍क्‍यांसह उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. “सब्जेक्‍ट नॉट टू बी क्‍लेअर’ असा शेरा असणारा विद्यार्थी नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत अर्ज करण्यास अपात्र ठरणार आहे. सर्व विषयांत 35 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरील विषयानुसार सर्व विषयांचे गुण एकत्रित करावे लागणार आहे. “बेस्ट ऑफ फाईव्ह’ निवडता येणार नाही.

आयजीएससीई, आयबी, आयजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रकावरील विषयानुसार सर्व विषयांचे गुण एकत्रित घ्यावेत. नंतर ते 500 गुणांमध्ये रुपांतरीत केले जातील. या विद्यार्थ्यांनाही “बेस्ट ऑफ फाईव्ह’ निवडता येणार नाही. तसेच, कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डा व्यतिरिक्त शालेय पातळीवरील परीक्षा उत्तीर्ण असल्यास असे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र समजण्यात येतील, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

झोननिहाय मार्गदर्शन केंद्रांची नावे
* आर.सी.एम. गुजराती ज्युनिअर कॉलेज (फडके हौद)
* डॉ. शामराव कलमाडी ज्युनिअर कॉलेज (एरंडवणा)
* राजीव गांधी ई-लर्निंग ज्यु. कॉलेज (सहकारनगर)
* सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स, कॉमर्स (आंबेगाव ब्रु.)
* सेंट मिरास कॉलेज ऑफ गर्ल्स (कोरेगाव पार्क)
* आबेदा इनामदार कॉलेज, कोंढवा (कॅम्प)
* सेंट पॅट्रिक्‍स कॉलेज (इम्प्रेस गार्डन)
* सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स (सेनापती बापट रस्ता)

पिंपरी-चिंचवड
* भारतीय जैन संस्थांचे ज्युनिअर कॉलेज (संत तुकाराम नगर, पिंपरी)
* एस.एन.बी.पी. ज्युनिअर कॉलेज (रहाटणी, पिंपरी)
* प्रेरणा ज्युनिअर कॉलेज (निगडी प्राधिकरण)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button