breaking-newsक्रिडा

अंपायरने केदारला हाताची पट्टी काढायला लावली, हे योग्य आहे का ?

भारतीय संघाने काल रात्री बांगलादेशला अंतिम सामन्यात पराभूत करत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. या विजयात पुण्याच्या केदार जाधवचा मोठा हात राहिला आहे.  बांगलादेशची सलामीची जोडी त्यानेच फोडली. त्यांच्या सलामीवीरांनी १२० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर केदारने सामन्यात भारतासाठी पहिला बळी मिळवला होता. त्यानंतर फलंदाजीस आल्यावर  त्याने शेवटची धाव घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.

या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यावर पुढे राहून भारताला विजय मिळवून देण्यात येणाऱ्या केदारवर सामन्यात अशी एक वेळ आली होती जेव्हा  केदार गोलंदाजी पेरण्यास पुन्हा आला तेव्हा अंपायर त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याच्या हाताला बांधलेली पट्टी काढण्याची सूचना केली. हाताच्या बोटांना काही दुखापत झाली असल्याने त्याने पट्टी बांधली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि  केदार आणि अंपायर यांच्यात काही चारचा झाली आणि त्याने हाताची पट्टी काढून गोलंदाजी केली.

 हे योग्य आहे का ?

एकदिवसीय सामन्यात चेंडूचा रंग पांढरा असतो.  केदारने हाताला बांधलेली पट्टी देखील पांढरी होती. त्यामुळे तो गोलंदाजी करताना  फलंदाजासचेंडू हातातून निघाला की नाही हे  कदाचित व्यवस्थीत दिसत नसेल. त्यामुळे फलंदाजांनी  हाताची पट्टी काढण्याबाबत अंपायरला विनंती केली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. जो योग्य असून नियामात आहे.

Kabali of Cricket@KabaliOf
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button